खा.चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पक्ष काँग्रेस सोबत फारकत घेणार
मुंबई, 28 डिसेंबर, (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस सोबत समाधानकारक चर्चा न झाल्याने खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टीने काँग्रेस कडून फारकत घेण्याच्या तयारीत आहे. समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे आदेश खासदार
खा.चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पक्ष काँग्रेस सोबत फारकत घेणार


मुंबई, 28 डिसेंबर, (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस सोबत समाधानकारक चर्चा न झाल्याने खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टीने काँग्रेस कडून फारकत घेण्याच्या तयारीत आहे. समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे आदेश खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांनी महाराष्ट्रातील पदाधिका-यांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर आजाद समाज पार्टीच्या पदाधिका-यांनी प्रदेश स्तरावर हर्षवर्धन सपकाळ यांची तर मुंबई अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन आपला प्रस्ताव सादर केला होता.

महाराष्ट्र स्तरावर स्थानिक पदाधिका-यांना चर्चेचे अधिकार देण्यात आल्याचे सपकाळ यांनी सांगितले होते.तसे निर्देश खाली देण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत सांगितले होते. मुंबई स्तरावर निवडक १४ जागांची मागणी आजाद समाज पार्टीने केली होती. त्यातील काही जागा देण्याची तयारी काँग्रेसने दाखविली होती.मात्र काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाल्यानंतर काँग्रेसने आजाद समाज पार्टीला जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे आता हा पक्ष स्वबळावर किंवा एम आय एम समाजवादी तसेच आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीसाठी उमेदवार उतरवत असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. तसेच झाल्यास मुंबईत समविचारी पक्षांची मते फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande