
नाशिक, 28 डिसेंबर (हिं.स.)।
- शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 29 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपशिखा गिरीश गोडबोले (29, रा. मुंबई) असे मृत तरुणीचे नाव आहे. सदर घटना रविवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिपशिखा ही तरुणी नाशिकमध्ये लग्नासाठी आली होती. गंगापूर गावाजवळील पामस्प्रिंग हॉटेलमध्ये ती वास्तव्यास होती. आज पहाटेच्या सुमारास ती अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी 11.57 वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV