नियोजित लातूर-कल्याण मार्गामाध्ये बदल न‌ करण्याची मागणी
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)। नियोजित लातूर कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) या मार्गामाध्ये बदल न करता लातूर अंबाजोगाई -केज - बीड-जामखेड - अहिल्यानगर कल्याण हाच मार्ग कायम ठेवण्याची मागणी खासदार रजनी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
नियोजित लातूर-कल्याण मार्गामाध्ये बदल न‌ करण्याची मागणी


बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)।

नियोजित लातूर कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) या मार्गामाध्ये बदल न करता लातूर अंबाजोगाई -केज - बीड-जामखेड - अहिल्यानगर कल्याण हाच मार्ग कायम ठेवण्याची मागणी खासदार रजनी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण लातूर ते मुंबई हे अंतर सध्याच्या १० ते १२ तासांवरून ४ ते ५ तासांत पुर्ण

करण्याच्या उद्देशाने लातूर कल्याण (जनकल्याण द्रुतगती गती मार्ग) हा महत्वाकांक्षी द्रुतगती प्रकल्प जाहीर केला आहे.

उपलब्ध माध्यमांव्दारे मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग लातूर कळंब -पारा ईट खर्डा जामखेड अहिल्यानगर कल्याण असा करण्याचे दिसून येत आहे. मात्र लातूर- अंबाजोगाई केज बीड-जामखेड अहिल्यानगर कल्याण हा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. तो मार्ग तांत्रिक, भौगोलिक तसेच सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अधिक योग्य व लाभदायक आहे. यामुळे

नियोजित लातूर कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) या मार्गामाध्ये बदल न करता लातूर अंबाजोगाई -केज - बीड-जामखेड - अहिल्यानगर कल्याण हाच मार्ग कायम ठेवण्याची मागणी खासदाररजनी पाटील यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande