
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
बीड, गेवराई आणि शिरूर तालुक्यांतील ३०० गावांच्या पोलिस पाटील पदासाठी बिंदुनामावली नुसार आरक्षण सोडत जाहीर झाली. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात बैठक पार पडली. महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती सर्वसाधारण ३७, अनुसूचित जाती महिलांसाठी १६, अनुसूचित जमाती सर्वसाधारण २५, अनुसूचित जमाती महिलांसाठी १०, विमुक्त जाती सर्वसाधारण १०, विमुक्त जाती महिला ४, भटक्या जमाती व सर्वसाधारणसाठी ९, भटक्या जमाती ब महिलांसाठी ४, भटक्या जमाती क सर्वसाधारण १२, भटक्या जमाती क महिलांसाठी ५, भटक्या जमाती ड
सर्वसाधारण ६, भटक्या जमाती ड महिलांसाठी ३, विशेष मागास प्रवर्ग -७, विशेष मागास प्रवर्ग महिलांसाठी -३, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सर्वसाधारण- ३५, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला -१५, सर्वसाधारण खुला- ६९, सर्वसाधारण महिलांसाठी-३० असे आरक्षण सुटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis