फ्लॅशबॅक 2025 : युवा बॅडमिंटनपटू चमकले, अनुभवी बॅडमिंटनपटूंचा सातत्य राखण्यासाठी संघर्ष
भारतीय बॅडमिंटनने दुखापती आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चढ-उतारांनी भरलेल्या २०२५ या कठीण वर्षाचा सामना केला. पण लक्ष्य सेनचे विजेतेपद, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मिळवलेले जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक आणि युवा बॅडमिंटनपटूं
युवा बॅडमिंटनपटू चमकले, अनुभवी बॅडमिंटनपटूंचा सातत्य राखण्यासाठी संघर्ष


युवा बॅडमिंटनपटू चमकले, अनुभवी बॅडमिंटनपटूंचा सातत्य राखण्यासाठी संघर्ष


युवा बॅडमिंटनपटू चमकले, अनुभवी बॅडमिंटनपटूंचा सातत्य राखण्यासाठी संघर्ष


युवा बॅडमिंटनपटू चमकले, अनुभवी बॅडमिंटनपटूंचा सातत्य राखण्यासाठी संघर्ष


युवा बॅडमिंटनपटू चमकले, अनुभवी बॅडमिंटनपटूंचा सातत्य राखण्यासाठी संघर्ष


भारतीय बॅडमिंटनने दुखापती आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चढ-उतारांनी भरलेल्या २०२५ या कठीण वर्षाचा सामना केला. पण लक्ष्य सेनचे विजेतेपद, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मिळवलेले जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक आणि युवा बॅडमिंटनपटूंनी केलेली समाधानकारक कामगिरी यामुळे या संक्रमणाच्या हंगामात माफक आशावादी चित्र निर्माण झाले आहे. कारण तंदुरुस्तीतील अडथळ्यांमुळे वर्षभर तयारी आणि लय बिघडल्याने अनुभवी बॅडमिंटनपटूंना सातत्य राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० स्पर्धेतील लक्ष्य सेनचा विजय हा या हंगामातील सर्वात महत्त्वपूर्ण वैयक्तिक यश ठरला.

पॅरिस ऑलिम्पिकमधील चौथ्या स्थानानंतरच्या कठीण काळानंतर या स्पर्धेच्या विजेतेपदाने लक्ष्य सेनला पुन्हा फॉर्ममध्ये परत आणले. हे सेनचे २०२३ मधील कॅनडा ओपननंतरचे पहिले सुपर ५०० विजेतेपद होते आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० जिंकल्यानंतरचे एकूण पहिले विजेतेपद होते. त्याने आणखी एक ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता. पण अंतिम अडथळा पार करू शकला नाही आणि हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेता ठरला.

एकंदरीत चढ-उताराच्या वर्षात, सात्विक आणि चिराग यांनी हंगामाच्या सुरुवातीला दुखापत आणि आजाराशी झुंज देऊनही भारताची प्रमुख दुहेरी जोडी म्हणून आपला दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला.या जोडीने पॅरिसमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. हाँगकाँग ओपन आणि चायना मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या बाद फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनून वर्षाचा सकारात्मक शेवट केला.

माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या किदाम्बी श्रीकांतसाठी या हंगामात पुनरागमनाची झलक दिसली. पण त्याला कोणतेही विजेतेपद मिळाले नाही. त्याने मलेशिया मास्टर्स आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून जुन्या दिवसांची आठवण करून दिली. पन विजेतेपदाचा प्रदीर्घ दुष्काळ संपवण्यात त्याला अपयश आले.

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गायत्री गोपीचंद आणि ट्रेसा जॉली यांनी महिला दुहेरीचे विजेतेपद यशस्वीरित्या राखले. ज्यामुळे या अस्थिर हंगामात स्थिरतेचा एक दुर्मिळ क्षण अनुभवायला मिळाला.

तरुण बॅडमिंटनपटूंची आगेकूच

भारताचे युवा बॅडमिंटनपटू यावर्षी आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरले. २० वर्षीय आयुष शेट्टीने एक आश्वासक हंगाम गाजवला. त्याने यू.एस. ओपन सुपर ३०० स्पर्धा जिंकली आणि बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवर सातत्याने स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य दाखवले. त्याने जपानच्या कोडाई नाराओका, माजी विश्वविजेता लोह कीन यू, चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेन आणि कॅनडाच्या ब्रायन यांग यांच्यावरही उल्लेखनीय विजय मिळवले, ज्यामुळे त्याच्या प्रगतीचा आलेख अधोरेखित झाला.

याहूनही अधिक लक्षवेधी ठरली ती १६ वर्षीय तन्वी शर्माची कामगिरी, जिने जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीत रौप्य पदक जिंकले.यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तिचे पहिले सुपर ३०० विजेतेपद थोडक्यात हुकले आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून तिने या हंगामातील एक उत्कृष्ट विजयही नोंदवला.गुवाहाटी मास्टर्समध्ये उपविजेतेपद मिळवून तन्वीने आपल्या वर्षाची सांगता केली.

उन्नती हुडानेही सातत्यपूर्ण कामगिरी केली. जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर तिने ओडिशा मास्टर्स सुपर १०० चे विजेतेपद पटकावून जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर झेप घेतली. चायना मास्टर्समध्ये वरिष्ठ सहकारी पीव्ही सिंधूवर मिळवलेल्या विजयामुळे ती अधिक चर्चेत आली. संस्कार सारस्वतने गुवाहाटी मास्टर्समध्ये मिळवलेल्या पहिल्या सुपर १०० विजेतेपदाने देशांतर्गत प्रतिभेची वाढती खोली आणखी अधोरेखित झाली.

अनुभवी बॅडमिंटनपटू छाप सोडण्यात अपयशी

एकीकडे युवा बॅडमिंटनपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा डौलना फडकवत होते. तर दुसरीकडे मात्र अनुभवी बॅडमिंटनपटूंसाठी २०२५ हे वर्ष बहुतांशी निराशाजनक ठरले.

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू तीन स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली होती. पण तिला सहा वेळा पहिल्याच फेरीत आणि चार वेळा दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. वर्षाच्या सुरुवातीला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने तिच्या मोहिमेत अडथळा निर्माण केला. त्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे तिला ऑक्टोबरपासून पुढील सर्व बीडब्ल्यूएफ स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली.

२०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता एचएस प्रणॉयसाठी तर हा हंगाम आणखी कठीण होता. २०२४ च्या मध्यातील चिकुनगुनियाच्या आजाराचे दीर्घकाळ राहिलेले परिणाम आणि वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याच्या फॉर्मवर गंभीर परिणाम झाला. जानेवारीमध्ये इंडिया ओपनमध्ये घोट्याची दुखापत आणि सप्टेंबरमध्ये कोरिया ओपनमध्ये बरगडीच्या स्नायूंची दुखापत यामुळे त्याला सातत्यपूर्ण सराव करता आला नाही, परिणामी त्याला नऊ वेळा दुसऱ्या फेरीत आणि आठ वेळा पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

सांघिक स्पर्धांमध्येही भारताचा संघर्ष दिसून आला. फेब्रुवारीमध्ये आशिया मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धा आणि मेमध्ये सुदिरमान चषकातील निराशाजनक कामगिरीने उच्च स्तरावरील बॅडमिंटनपटूंमध्ये प्रतिभा आणि तंदुरुस्तीच्या व्यापक अभावाचे दर्शन घडवले. खेळाच्या मैदानाबाहेर, मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी अव्वल स्थानी पोहोचण्यात अपयशी ठरलेल्या बॅडमिंटनपटूंसाठी पर्यायी करिअर मार्गांच्या अभावाचा मुद्दा उपस्थित केल्याने एक वाद सुरू झाला. आर्थिक सुरक्षिततेशिवाय खेळाला करिअर म्हणून निवडू नये, असा सल्ला देणाऱ्या त्यांच्या विधानामुळे क्रीडा जगतात मतभेद निर्माण झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande