बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक
ढाका , 28 डिसेंबर (हिं.स.)।बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांची अवस्था सध्या “अत्यंत गंभीर” आहे. 80 वर्षांच्या खालिदा झिया सध्या ढाक्यातील एव्हरके
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक


ढाका , 28 डिसेंबर (हिं.स.)।बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांची अवस्था सध्या “अत्यंत गंभीर” आहे. 80 वर्षांच्या खालिदा झिया सध्या ढाक्यातील एव्हरकेअर रुग्णालयात दाखल आहेत. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) यांच्या प्रमुख खालिदा झिया यांच्यावर 23 नोव्हेंबरपासून उपचार सुरू आहेत.

11 डिसेंबर रोजी त्यांच्या फुफ्फुसांना आणि शरीराला विश्रांती मिळावी यासाठी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना डॉ. ए.झेड.एम. जाहिद यांनी सांगितले की, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, असे सध्या म्हणता येणार नाही. त्या अत्यंत कठीण काळातून जात आहेत.

एका वृत्तसंकेतस्थळानुसार, डॉक्टरांनी देशातील जनतेला खालिदा झिया यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “जर देवाची कृपा झाली आणि त्या या नाजूक टप्प्यातून बाहेर पडल्या, तरच एखादी चांगली बातमी मिळू शकेल.” दरम्यान, त्यांचे पुत्र आणि बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांनी रुग्णालयात जाऊन आईची विचारपूस केली आणि तेथे दोन तासांहून अधिक वेळ घालवला.

खालिदा झिया यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिलेल्या या निवेदनानंतर बीएनपी समर्थकांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना सुरू केल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी परदेशातून डॉक्टरांची एक टीम त्यांना एअरलिफ्ट करून नेण्याची शक्यता तपासण्यासाठी बांग्लादेशात आली होती. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्याने ते शक्य होऊ शकले नाही.

बीएनपीची इच्छा त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी परदेशात नेण्याची होती. मात्र सध्याची शारीरिक अवस्था पाहता त्यांचा हवाई प्रवास सुरक्षित नसल्याने सध्या देशातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या देखरेखीकरिता स्थानिक तसेच परदेशी डॉक्टरांची एक संयुक्त टीम कार्यरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande