ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे नूर खान तळ उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी - पाक परराष्ट्रमंत्री
इस्लामाबाद , 28 डिसेंबर (हिं.स.)। पाकिस्तानी सरकार पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर लज्जास्पद ठरले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर झालेल्या चकमकीदरम्यान भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये नूर खान एअरबेसचे नुकसान झाले. तसेच तेथे तैनात असलेले अनेक जवान जखमी झाले
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे नूर खान तळ उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी- पाक परराष्ट्रमंत्री


इस्लामाबाद , 28 डिसेंबर (हिं.स.)। पाकिस्तानी सरकार पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर लज्जास्पद ठरले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर झालेल्या चकमकीदरम्यान भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये नूर खान एअरबेसचे नुकसान झाले. तसेच तेथे तैनात असलेले अनेक जवान जखमी झाले असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानने आपल्या लष्करी तळांवर भारताने केलेल्या धोरणात्मक आणि अचूक हल्ल्यांचा परिणाम मान्य केला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने रावळपिंडीतील चकला भागात असलेल्या नूर खान एअरबेसला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्करी तळाचे नुकसान झाले असून तेथे तैनात जवानही जखमी झाले. या पत्रकार परिषदेत इशाक डार म्हणाले की, भारताने अवघ्या 36 तासांत पाकिस्तानी हद्दीत अनेक ड्रोन पाठवले होते. यापैकी एका ड्रोनमुळे लष्करी तळाचे नुकसान झाले, जे ऑपरेशनच्या व्याप्ती आणि अचूकतेचे निदर्शक आहे.

इशाक डार यांनी दावा केला, “भारताने पाकिस्तानच्या दिशेने ड्रोन पाठवले. 36 तासांत किमान 80 ड्रोन पाठवण्यात आले. त्यापैकी 79 ड्रोन आम्ही अडवण्यात यशस्वी ठरलो, मात्र एका ड्रोनमुळे लष्करी तळाचे नुकसान झाले आणि या हल्ल्यात आमचे जवान जखमी झाले.”

घटनाक्रमाचा सविस्तर उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, 9 मेच्या रात्री पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे नागरी आणि लष्करी नेतृत्वाची बैठक झाली आणि बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही निर्णयांना मंजुरी देण्यात आली. परराष्ट्र मंत्री डार यांनी पुढे असेही म्हटले की, 10 मेच्या सकाळी भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला करून चूक केली, तसेच त्या हल्ल्यात झालेले नुकसानही त्यांनी मान्य केले. यासोबतच, मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी लष्करी तळांवर केलेल्या भारताच्या धोरणात्मक कारवाईची कबुलीही त्यांनी दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू-काश्मीर (PoJK) मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. मे महिन्यात या ऑपरेशनअंतर्गत करण्यात आलेल्या भारताच्या अचूक हल्ल्यांमध्ये चकला येथील पाकिस्तान हवाई दलाचा नूर खान एअरबेस मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande