रायगड जिल्ह्यात एमसीएच्या मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
रायगड, 28 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या एकदिवसीय ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील १५ सामने रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिए
रायगड जिल्ह्यात एमसीएच्या मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


रायगड, 28 डिसेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या एकदिवसीय ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील १५ सामने रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए) यांच्या माध्यमातून हे सामने दिनांक २९ डिसेंबर ते ०४ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील विविध मैदानांवर खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पेण; छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, गव्हाण; उलवे तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स ग्राउंड, रसायनी पाताळगंगा या मैदानांची निवड करण्यात आली आहे. एमसीएच्या ग्रुप ‘जी’ मध्ये एकूण सहा संघांचा समावेश असून त्यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मुलींचा संघ, सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन, चंद्रोस क्रिकेट क्लब पुणे, बास क्रिकेट क्लब पुणे आणि ज्यूडिशियल क्रिकेट अकॅडमी पुणे या संघांचा सहभाग असणार आहे.

स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व स्वरा खेडेकर (कर्णधार) करणार असून संघात गार्गी साळुंके, भ्रताती राय, काव्या धावडे, स्वरा बामुगडे, तनश्री सावंत, वेदिका तेटगुडे, संस्कृती पालकर, कनक यादव, दिव्यांका धनावडे, प्रचिती जाधव, किमया कदम, समिधा तांडेल, स्वरा भगत आणि निशिता विठ्ठलानी यांचा समावेश आहे. राखीव खेळाडू म्हणून तनिष्का वार्गे, रशिता डे, आरुषी जाधव, अनिषा वर्मा, मधुरा बाबर, श्रुती अग्री, वेदश्री शेळके व शुभांगिनी दास यांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंना आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या असून या स्पर्धेत रायगडच्या मुली उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande