छ. संभाजीनगर मनपा निवडणुकीच्या संदर्भात महायुतीची महत्त्वाची बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 28 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात महायुतीसाठी महत्त्वाची बैठक खासदार डॉ.भागवत कराड यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरणार आहे. निवड
खासदार डॉ.भागवत कराड यांच्या निवासस्थानी


छत्रपती संभाजीनगर, 28 डिसेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात महायुतीसाठी महत्त्वाची बैठक खासदार डॉ.भागवत कराड यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरणार आहे.

निवडणूक रणनिती, संघटनात्मक बांधणी, प्रभाग निहाय आढावा तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

महायुतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे आणि प्रभावीपणे काम करण्याबाबत चर्चा आणि संवाद झाला.

यावेळी पालकमंत्री संजय शिरसाठ कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार श्री.संदीपान भुमरे, आमदार श्री.संजय केनेकर, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर विकास जैन, जिल्हाप्रमुख श्री.राजेंद्र जंजाळ, शहराध्यक्ष श्री.किशोर शितोळे, निवडणूक प्रमुख श्री.समीर राजुरकर, श्री.ऋषिकेश जैस्वाल यांच्यासह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande