
छत्रपती संभाजीनगर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ’महानुभव साहित्य : काल, आज आणि उद्या’ या विषयावर येत्या सोमवारी (दि.३०) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
’महंत भास्करबाबा नागराजबाबा महानुभव’ या नावाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम ट्रस्ट, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी (दि.३०) महानुभाव आश्रम, पैठण रोड या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संलग्नित महाविद्यालय विद्यापीठ विभागातील दोन स्पर्धेक वक्तृत्व स्पर्धेसाठी सोबत जोडलेल्या प्रवेशिकेच्या छायाकित प्रती करुन प्रत्येकी विद्यार्थ्यांची प्रवेशिका प्रमाणित करुन विद्यार्थ्यांसोबत पाठवावी, असे आवाहन संचालक विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी केले आहे.
वत्तृâत्व स्पर्धेचा विषय - ’महानुभाव साहित्य : काल, आज आणि उद्या’ हा आहे. स्पर्धेची वेळ : ०७ मिनेटे असून वत्तृâत्व स्पर्धा श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे माध्यम मराठी व हिंदी असून ही स्पर्धा मराठी व हिंदी या दोन्ही भाषेत संमिश्र अशी राहील व या समिश्र स्पर्धकामधून तीन स्पर्धकांची बक्षिसासाठी निवड करण्यात येईल. बक्षीस वितरण ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. या स्पर्धेचे रोख बक्षीस आचार्य संतोष मुनी शास्त्री, श्रीकृष्ण मंडिर, महानुभाव आक्षम पैठण यांच्याकडॅन देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे रोख बक्षीस अनुक्रमे सात हजार, पाच हजार, तीन हजार व ११०० रुपये असणार आहे. विद्यापीठातर्फे स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल, तरी कृपया नावनोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis