पाटोदा ते जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी गती मिळाली
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)। पाटोदा ते जामखेड दरम्यानच्या एनएच -५४८ डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार सुरेश धस यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. या मागणीनंतर केंद्र शासन स्त
पाटोदा ते जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी गती मिळाली


बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)।

पाटोदा ते जामखेड दरम्यानच्या एनएच -५४८ डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार सुरेश धस यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. या मागणीनंतर केंद्र शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या रस्त्याच्या उर्वरित अपूर्ण टण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

या संदर्भात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सल्लागार (तांत्रिक) बालासाहेब ठेंग यांनी अधिकृत पत्राद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

या पत्रात एनएच-५४८ डी अहमदपूर-अंबाजोगाई-माजरसुंबा-पाटोदा-जामखेड या राष्ट्रीय महामार्गावरील पाटोदा (जि. बीड) ते जामखेड हा सुमारे ३० किमी भाग अद्याप अपूर्ण असून, तो बीड जिल्ह्यात अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे सामान्य नागरिक, प्रवासी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन आ. सुरेश धस यांनी उर्वरित अपूर्ण लांबीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने सल्लागार (तांत्रिक) बालासाहेब ठेंग यांनी मंत्रालयाच्या वतीने प्रादेशिक अधिकारी, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी मुंबई तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande