
छत्रपती संभाजीनगर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा.रामराव माने यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी व मित्रपरिवातर्फे सुरु करण्यात आलेला आहे.
पहिला प्रा.रामराव माने मेमोरियल स्मृती पुरस्कार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील जेएनयु प्रा.राम सागर मिश्रा यांना त्यांच्या शैक्षणिक व संशोधनातील योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ केमिस्टस् अॅण्ड बायोलॉजिस्टस् च्या ३१ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कलिंगा इनस्ट्रीटयूट ऑप इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी केआय आयटी या विद्यापीठात देण्यात आला. आयएससीबीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरु प्रा.अना मिक शाह, महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.भालचंद्र भगणे, के आयआयटीचे कुलगुरु प्रा.सरनजीत सिंह, आंतरराष्ट्रीय नियतकालिताचे चीफ एडिअर प्रा.निशील देसाई, माजी बीसीयुडीचे संचालक प्रा.मुरलीधर शिनगारे, परिषदेचे समन्वयक अधिष्ठाता प्रा.बापूराव शिंगटे व प्रा.धनंजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्काराचे स्वरुप पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह व सन्माप्रत्र असे आहे. डॉ.रामराव माने सरांच्या विद्यापीठातील ३५ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व आर्थिक मदत केली होती. रसायन विभागात एम.एस्सी, नेट, सेट, गेट व पीएच.डी करणा-या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्मरावर शास्त्रज्ञ, प्राचार्य प्राध्यापक म्हणून व नामांकित कंपन्यात संशोधक म्हणून कार्यरत आहेत. डॉ.माने यानी विद्यापीठात कार्यरत असतांना सुवर्णजयंती शिष्यवृत्ती, कमवा-शिका योजना, परिसर विकास शैक्षणिक व प्रशासकीय सुधारण, पीएच.डी प्रवेश, धाराशिव उपपरिसर यामधील योगदान उल्लेखनीय आहे. डॉ.माने हे विद्यापीठात २००६-२०१० या कालावधीत आधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाच्या नवीन विद्यापीठ कायदा सुधारणा समितीचे सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis