मुंबईत पीपल्स रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये हव्यात आठ जागा; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
मुंबई, 28 डिसेंबर, (हिं.स.)। माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीने मुंबईतून केवळ आठ जागांची मागणी करूनही अद्याप निर्णय होत नसल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पीपल्स रिपब्लिक
मुंबईत पीपल्स रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये हव्यात आठ जागा; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


मुंबई, 28 डिसेंबर, (हिं.स.)। माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीने मुंबईतून केवळ आठ जागांची मागणी करूनही अद्याप निर्णय होत नसल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती असून हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.

या पक्षाकडून मुंबईतून आठ तसेच राज्यभरातून निवडक जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेली आहे.

मात्र उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी अवघे दोनच दिवस उरले असतानाही अद्याप या पक्षाला कोणताही निरोप न आल्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून त्वरीत निर्णय घेण्याची मागणी मुंबई अध्यक्ष विजय वाघमारे यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande