
लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
अभिजात साहित्य हे शाश्वत मुल्याचे केंद्र असून मानवी जीवनाच्या अंतरंगावरही परिणाम घडवत असते मानवता वाद ही रुजवू शकते त्याच बरोबर सभ्य समाज व सभ्य माणूस घडवत असते दिशाहीन तरुण पिढीच्या समोर तालुकास्तरावर ग्रंथालयासारखे संस्कार केंद्र उभारले पाहिजे. साहित्यिकाच्या साहित्यतून संस्कार झाले पाहिजे, साहित्य संमेलनाची गरज तेवढयासाठीच आहे. नैतिक शक्ती साहित्यातून निर्माण होऊ शकते, असे मत संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा डॉ. नागोराव कुंभार यांनी व्यक्त केले.
शिरूर अनंतपाळ येथे श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ते बोलत होते. कार्यक्रमास अॅड. संभाजीराव पाटील, कवी देवीदास फुलारी, फ. म. शाहाजिंदे, श्रीधर नांदेडकर, डॉ. मंजुषा कुलकर्णी, जेष्ठ साहित्यिक
दगडू लोमटे, ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष गजानन कोटेवार सुनिल हुसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात घोडे, लेझिम पथक, वारकरी पथक, विविध वेषभुषा परिधान, करून गांधी चौक ते शिवराज पाटील चाकूरकर साहित्य नगरी मोरया लॉन्स पर्यंत ग्रंथदिडी पोहंचली.
या संमेलनासाठी मंत्री, खासदार, आमदार यासह अधिकारी पदाधिकारी याना निमंत्रित केले होते. परंतु यापैकी कोणीही उपस्थिती नसल्याने लोकप्रतिनिधींनी सम्मेलनांकडे पाठ फिरवल्याची चर्चा सभामंडपात रंगली होती.
साहित्याचे भाषिक योगदान शाळा, महाविद्यालय, तसेच साहित्य सम्मेलनातुन मांडले पाहिजे. कारण भाषेचे योगदान मोठे आहे. असे मत डॉ. जयद्रथ जाधव यांनी तृत्तीय सत्रात व्यक्त केले. द्वित्तीय सत्रात धनंजय गुडसुरकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला,
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis