मागणीनंतर उदगीरच्या वाढवणात सोयाबीन हमीभाव केंद्र अखेर सुरू
हंडरगुळीसह परिसरातील शेतकऱ्यांची सोय लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)। शासनमान्य सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. याची दखल घेत उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील अॅग्रोविंग्स अॅग्रो कंपनीने वाढवणा पाटी किनी यल्लादेवी ये
मागणीनंतर उदगीरच्या वाढवणात सोयाबीन हमीभाव केंद्र अखेर सुरू


हंडरगुळीसह परिसरातील शेतकऱ्यांची सोय

लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।

शासनमान्य सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. याची दखल घेत उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील अॅग्रोविंग्स अॅग्रो कंपनीने वाढवणा पाटी किनी यल्लादेवी येथे सोयाबीन केंद्र सुरु केले असल्याने परिसरातील शेतक-यांची सोय झाली आहे.

राज्याच्या अनेक भागात असे सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु झाले. माञ या भागात केंद्र नव्हते. म्हणुन वाढवणा परिसरातील बहूतांश मध्यमवर्गीय शेतक-यांनी आडतीला पडेल भावात सोयाबीन विकले.तर असंख्य शेतकरी शासनमान्य हमीभाव केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करत होते. शासनमान्य हमी भाव केंद्र आजवर नव्हते. म्हणुन अनेकांनी आडतीत पडेल भावात सोयाबीन विकले. माञ उशीरा का होईना वाढवणला केंद्र सुरु झाल्याने शेतक-यांची सोय झाली आहे.

उदगीर, जळकोट, चाकुर तालुका हद्दीतील हंडरगुळी, रुद्रवाडी, मोर्तळवाडी, सुकणी, जगळपुर, डॉग्रज, शेळगाव, डाऊळ, हिप्परगा सुकणी सह शेकडो गावातील शेतकरी-यांची सोय झाल्याने शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande