
छत्रपती संभाजीनगर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाची निवड चाचणी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राज्य सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवासाठी १८ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संचालक डॉ सोमनाथ खडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे ४ व ७ जानेवारी २०२६ या दरम्यान उत्कर्ष राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाची निवड चाचणी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागात करण्यात आली. या निवड चाचणीसाठी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड व धाराशिव जिल्हयातील विविध महाविद्यालयातून ९५ स्वयंसेवक आले होते. या स्वयंसेवका मधून ०९ स्वयंसेवक व ०९ स्वयंसेविकांची निवड करण्यात आली.संकल्पनानृत्य,पथनाटय, समूहगीत, भारतील लोकवाद्य वादन,सुरवाद्य,पोवाडा,भारâड, भजन,वक्तृत्व,कविता,इत्यादी या निवड चाचणीसाठी संचालक,रासेयो डॉ.सोमीनाथ खाडे, परिक्षक म्हणून डॉ. संतोष गालफाडे,नाटशास्स्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजागाई, डॉ.प्रितेश कलान, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय,छत्रापती संभाजीनगर, डॉ.अजय पाटील, डॉ. किरण गायकवाड ,प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. जिल्हा समन्वयक/नोडल अधिकारी डॉ. अनंत कणगरे, देवगिरी महाविद्यालय,छत्रापती संभाजीनगर,रासेयो कार्यकमाधिकारी, डॉ. वैशाली चौधरी, डॉ. पी.बी.महाजन रासेयो कार्यालयातील कर्मचारी.अनिल मालकर, वरिष्ठ सहाय्यक, शालिकराम ढेपले, श्याम बन्सवाल, सुलिन पैठणे,आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis