बीड जिल्हा क्रिकेट संघाच्या निवड चाचणीत ३० जणांची निवड
बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)।शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १६ वर्षाखालील वयोगटातील संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले ह. या चाचणीस जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. न
बीड जिल्हा क्रिकेट संघाच्या निवड चाचणीत ३० जणांची निवड


बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)।शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १६ वर्षाखालील वयोगटातील संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले ह. या चाचणीस जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड चाचणीसाठी जिल्हाभरातील ७० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यातील ३० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा १६ वर्षांखालील क्रिकेट संघ निवडीसाठी आयोजित निवड चाचणीस बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव डॉ. अमी सलीम तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार गंमत भंडारी, सी. आर. पाटेल, यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा १६ वर्षाखालील क्रिकेट संघ निवडीसाठी आयोजित निवड चाचणीसाठी जिल्हाभरातील ७० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यातील ३० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या ३० खेळाडूंमधून पुन्हा १५ जणांची टीम तयार करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande