बीड- शारदा क्रीडा महोत्सव अंतर्गत मुलींची कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा
बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित शारदा क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत मुलींच्या कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. कब्बडी स्पर्धेत खेळाडूंनी ताकद, वेग, चपळता व उत्तम समन्वय साधत प्रेक्षकांची मने जिंकली. बुद
बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि रणनीती यांचा उत्कृष्ट प्रत्यय


बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि रणनीती यांचा उत्कृष्ट प्रत्यय


बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित शारदा क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत मुलींच्या कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. कब्बडी स्पर्धेत खेळाडूंनी ताकद, वेग, चपळता व उत्तम समन्वय साधत प्रेक्षकांची मने जिंकली.

बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि रणनीती यांचा उत्कृष्ट प्रत्यय देत स्पर्धेला वेगळीच उंची दिली.शारदा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून गेवराई तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती वाढीस लागली आहे. क्रीडा महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातूनच उत्तम खेळाडू तयार होऊन एक दिवस आपला खेळाडू देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास शारदा स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष रणवीर अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था अंतर्गत शारदा क्रीडा महोत्सवात मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था अंतर्गत शारदा क्रीडा महोत्सवात मुलींच्या कब्बडी स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा महोत्सवात बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

यावेळी शारदा विद्या मंदिरच्या सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध गितावर नेत्रदीपक नृत्य करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. चला जगूया.. चला जिंकूया.... मोठी लढाई लढू...... रांगडा खेळ हा खेळ आपल्या मातीच.......बड्डी... बट्टी....खेळ आमचा जगात लय भारी... अशा विविध उत्साहपुर्वक गाण्यावर नृत्य करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.शुभारंभाचा सामना शारदा विद्यामंदिर गेवराई विरुद्ध जयभवानी विद्यालय गढी आणि दुसरा सामना माध्यमिक विद्यालय मारफळा विरुद्ध शिवाजी विद्यालय मालेगाव यांच्यात झाला. यावेळी बुद्धिबळ स्पर्धांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande