न्यू जर्सीमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने अपघात; एकाचा मृत्यू
वॉशिंग्टन , 29 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात रविवारी एक भीषण विमान अपघात घडला. दक्षिण न्यू जर्सीमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने (हवेतच टक्कर झाल्याने) अपघात घडला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती गं
न्यू जर्सीमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने  अपघात; एकाचा मृत्यू


वॉशिंग्टन , 29 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात रविवारी एक भीषण विमान अपघात घडला. दक्षिण न्यू जर्सीमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने (हवेतच टक्कर झाल्याने) अपघात घडला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताशी संबंधित अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही हेलिकॉप्टरांची हवेतच टक्कर झाली. फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने या घटनेला “मिड-एअर कोलिजन” म्हणजेच हवेत झालेली टक्कर असे संबोधले आहे. एफएएच्या माहितीनुसार, हा अपघात हॅमॉन्टन म्युनिसिपल एअरपोर्टच्या वर एनस्ट्रॉम F-28A हेलिकॉप्टर आणि एनस्ट्रॉम 280C हेलिकॉप्टर यांच्यात झाला. दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये केवळ त्यांचे पायलटच होते. यामध्ये एका पायलटचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या पायलट गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हवेत झालेल्या टक्करीनंतर एक हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर जाऊन वेगाने फिरताना दिसले आणि नंतर जोरात जमिनीवर कोसळले, ज्यामुळे त्याला आग लागली. ही घटना न्यू जर्सीतील अटलांटिक काउंटीमधील हॅमॉन्टन म्युनिसिपल एअरपोर्टजवळ घडली. या अपघाताशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर आले असून, त्यापैकी एका नव्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर नियंत्रण गमावून वेगाने फिरत खाली पडताना स्पष्टपणे दिसत आहे.

एक्स वरील आपत्कालीन अलर्ट पेजनुसार, ही टक्कर 100 बेसिन रोडजवळ झाली. टक्करीनंतर एक हेलिकॉप्टर जंगलभागात कोसळल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळावरून एका जखमी व्यक्तीला बाहेर काढण्यात आले असून, इतर संभाव्य जखमींच्या शोधासाठी शोध व बचाव (सर्च अँड रेस्क्यू) मोहीम सुरू आहे. घटनास्थळावरून समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये परिसरातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. दरम्यान, समोर आलेल्या एका नव्या क्लिपमध्ये हेलिकॉप्टर जमिनीवर आदळण्यापूर्वी नियंत्रणाबाहेर जाऊन फिरताना दिसत असून, या अपघाताची भीषणता यातून स्पष्ट होते.

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande