बांग्लादेशने फेटाळले हिंदूंवर हल्ले होत असल्याचे भारताचे दावे
ढाका, 28 डिसेंबर (हिं.स.)। बांग्लादेशमध्ये हिंदूंविरोधात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवरून भारताने मुद्दा उपस्थित केला होता. यावर आता बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रतिक्रिया आली आहे. युनूस सरकारने भारताचे दावे पूर्णपणे फेटाळून लावत, य
बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले होत असल्याचे भारताचे दावे बांग्लादेशने फेटाळले


ढाका, 28 डिसेंबर (हिं.स.)। बांग्लादेशमध्ये हिंदूंविरोधात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवरून भारताने मुद्दा उपस्थित केला होता. यावर आता बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रतिक्रिया आली आहे. युनूस सरकारने भारताचे दावे पूर्णपणे फेटाळून लावत, या घटनांना “वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना” असे संबोधले आहे.

रविवारी (28 डिसेंबर) बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने अल्पसंख्याक समुदायांच्या परिस्थितीबाबत भारताने केलेल्या आरोपांना नाकारत म्हटले की, अशा टिप्पण्या जमिनीवरील वास्तव परिस्थितीचे प्रतिबिंब नाहीत. या विधानांना बांग्लादेशने खोटे आणि दिशाभूल करणारे ठरवले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, देशातील दीर्घकाळापासून चालत आलेल्या सांप्रदायिक सलोख्याच्या परंपरेचे चुकीचे चित्रण करणारी कोणतीही मांडणी बांग्लादेश पूर्णपणे नाकारतो. या निवेदनात अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, “वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांना” हिंदूंवरील संघटित छळ म्हणून दाखवण्याचा आणि अशा टिप्पण्यांचा वापर भारतातील काही भागांमध्ये बांग्लादेशविरोधी भावना पसरवण्यासाठी करण्याचा एक सुनियोजित प्रयत्न केला जात आहे.

बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, काही गट जाणीवपूर्वक ठराविक घटनांची निवड करून त्यांचा प्रचार करत आहेत आणि त्यांचे विकृतीकरण करत आहेत, जेणेकरून सामान्य भारतीय नागरिकांना बांग्लादेश, भारतातील त्याचे राजनैतिक मिशन आणि संस्थांविरोधात भडकवता येईल. मंत्रालयाने पुढे स्पष्ट केले की, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) प्रवक्त्यांनी ज्या व्यक्तीचा उल्लेख केला होता, ती व्यक्ती एक नोंदणीकृत गुन्हेगार होती. त्या व्यक्तीचा मृत्यू एका मुस्लिम सहकाऱ्यासोबत मिळून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नादरम्यान झाला होता. या प्रकरणात संबंधित मुस्लिम सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. या घटनेला अल्पसंख्याकांशी संबंधित मुद्दा म्हणून मांडणे केवळ चुकीचेच नाही, तर पूर्णपणे दिशाभूल करणारे असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले.

दरम्यान, शुक्रवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (एमएफए) बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या सततच्या शत्रुत्वाबद्दल चिंता व्यक्त केली होती. या संदर्भात मेमनसिंग येथे नुकत्याच झालेल्या हिंदू तरुण दीपू दास यांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला होता. जमावाने मारहाण करून दीपू दास यांची हत्या केल्याचे सांगण्यात आले होते. या हत्येबाबत भारताने व्यक्त केलेल्या चिंतेवर प्रतिक्रिया देताना बांग्लादेशने म्हटले की, वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांना हिंदूंवरील संघटित अत्याचार म्हणून दाखवण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande