विकलेले प्लॉट चौघांनी मिळून पुन्हा परस्पर दुसऱ्याला विकले; गुन्हा दाखल
सोलापूर, 3 डिसेंबर, (हिं.स.)। विनायक नगर व कल्पना नगरातील खुले प्लॉट चौघांनी मिळून विकले. त्यापोटी चार लाख ३० हजार रुपये घेतले. तरीपण, चौघांनी मिळून मूळ मालकाच्या संमतीशिवाय प्लॉट परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केली, अशी फिर्याद श्रीदेवी आप्पाशा माय
विकलेले प्लॉट चौघांनी मिळून पुन्हा परस्पर दुसऱ्याला विकले; गुन्हा दाखल


सोलापूर, 3 डिसेंबर, (हिं.स.)। विनायक नगर व कल्पना नगरातील खुले प्लॉट चौघांनी मिळून विकले. त्यापोटी चार लाख ३० हजार रुपये घेतले. तरीपण, चौघांनी मिळून मूळ मालकाच्या संमतीशिवाय प्लॉट परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केली, अशी फिर्याद श्रीदेवी आप्पाशा मायनाळे (रा. आशीर्वाद नगर, मजरेवाडी) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी श्रीदेवी मायनाळे, त्यांची मृत आई कमलाबाई सिद्राम नवले, मृत सावत्र आई चिमनाबाई यांना विठ्ठल दशरथ कदम, प्रमोद विठ्ठल कदम, प्रदीप विठ्ठल कदम व प्रशांत विठ्ठल कदम यांनी ३१ डिसेंबर २००९ मध्ये एक लाख ७० हजार रुपयास एक प्लॉट विकला होता. २०१४ मध्ये विनायक नगरातील आठ प्लॉट पत्नी मिना विठ्ठल कदम यांना विकले. पत्नी मयत झाल्यावर जानेवारी २०२५ मध्ये प्रमोद विठ्ठल कदम यास नोटरी कब्जा पावती करून दिली.

त्याला चौघांनीही संमती दिली. तत्पूर्वी, ७ मार्च २०१४ रोजी विनायक नगरातील तीन प्लॉट विकले. तर एक प्लॉट प्रदिप कदम यास खरेदी दिला. दरम्यान, चौघांनी मिळून फिर्यादी श्रीदेवी मायनाळे यां मूळ मालक असताना देखील त्यांना कोणताही मोबदला न देता संमतीशिवाय परस्पर विकून लाभ मिळविला, असेही फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande