
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हडपसर परिसरात मेफेड्रॉनची (एम.डी.) विक्री करणाऱ्या व्यक्तीस अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे १२७ ग्रॅम एम.डी. आणि रोकड असा एकूण ३२ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साजिद असद खान (वय ३५, रा. राजगड सोसायटी, सुरक्षानगर, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथक युनिट पाचच्या हद्दीत गस्तीवर असताना हा गुन्हा उघडकीस आला. पथकातील पोलिस कर्मचारी गोसावी वस्ती, वानवडी येथून ससाणेनगरकडे जात होते.
त्यावेळी राजगड सोसायटीसमोर एक मोटार उभी असल्याचे निदर्शनास आले. मोटारीतील व्यक्तीस ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने साजिद खान असे नाव सांगितले. त्याची झडती घेतली असता ६२ ग्रॅम मेफेड्रॉन अमली पदार्थ आढळून आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु