नांदेड : कुबड्यासह अन्य एकास पोलिसांनी केले स्थानबध्द
नांदेड, 6 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशावरून जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार कुबड्यासह अन्य एकाची एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उपद्रवी गुन्हेगारांवर प
दरम्यान पोलिसांनी गुन्हेगारांना ताब्यात घेवून छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहामध्ये बंद केले.


नांदेड, 6 डिसेंबर (हिं.स.)।

नांदेड पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशावरून जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार कुबड्यासह अन्य एकाची एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

उपद्रवी गुन्हेगारांवर पोलीसांची बारकाईने नजर असून अशा गुन्हेगारांवर स्थानबध्द सारखी कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. स्थानबद्ध करण्यात आलेला गुन्हेगार गणेश भुजंगराव मोरे रा. शाहूनगर वाघाळा याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कृत्य करीत असल्यामुळे व त्याच्याविरुद्ध यापूर्वी देखील एमपीडीए अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असताना तो कारागृहाबाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्याची गुन्हेगारी वृत्ती चालूच ठेवल्यामुळे त्याचबरोबर गुन्हेगार शेख इरफान ऊर्फ कुबडा शेख गुड्डू रा. नवी आबादी नांदेड याच्या विरुद्धही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोनि ओमकांत चिंचोलकर व शिवाजीनगर ठाण्याचे पोनि राजेश पुरी यांनी गुन्हेगारांना एमपीडीए अधिनियमाप्रमाणे स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे पाठविला. त्यावरस्थागुशाचे पोनि उदय खंडेराय यांनी निरीक्षण केले व तो प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंजूरी दिली.

जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एमपीडीए अंतर्गत सन २०२५ या चालू वर्षामध्ये ३५ सराईत गुन्हेगारास कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सन २०२४-२०२५ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे एकुण १५० गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. तसेच सन २०२५ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे एकूण २७गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande