
नवी दिल्ली, ४ डिसेंबर (हिं.स.)भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने अंतिम फेरीत माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदला हरवून जेरुसलेम मास्टर्स २०२५ चे विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. रॅपिड स्टेजचे पहिले दोन गेम ड्रॉ केल्यानंतर, एरिगेसीने पहिल्या ब्लिट्झ गेममध्ये व्हाईट पिसेससह निर्णायक विजय मिळवला. दुसऱ्या ब्लिट्झ गेममध्येही तो चांगल्या स्थितीत होता. पण सुरक्षित ड्रॉ स्वीकारून त्याने विजेतेपद मिळवले. या जेतेपदाच्या विजयासह २२ वर्षीय एरिगेसीला ५५,००० अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली.
अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी, एरिगेसीने सेमीफायनलमध्ये रशियाच्या पीटर स्विडलरचा पराभव केला, तर आनंदने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इयान नेपोम्नियाच्चीचा पराभव केला. दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंनी आपापल्या सेमीफायनलमधील दुसरा रॅपिड गेम जिंकलातिसऱ्या स्थानाच्या सामन्यात, स्विडलरने त्याच्याच देशाच्या नेपोम्नियाच्चीचा २.५-१.५ असा पराभव केला. दुसऱ्या ब्लिट्झ गेममध्ये त्याने निर्णायक आघाडी मिळवलीस्विडलरने प्राथमिक राउंड-रॉबिन टप्प्यात ८/११ गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर नेपोम्नियाच्ची, आनंद आणि एरिगेसी यांनी ७.५/११ गुणांसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे