
जळगाव, 4 डिसेंबर (हिं.स.)येथून जवळ असलेल्या शासकीय आयटीआय परिसरात काल रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी सुमारे साडेसात किलो वजनाचा गांजा जप्त केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अचानक उघडकीस आलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
धरणगाव–चोपडा रस्त्यावरील शासकीय आयटीआयजवळ रात्री आठ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास एक संशयित हालचाली आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दबा धरत सुमारे साडेसात किलोचा गांजा हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी, रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील आणि किशोर भोई आदींचा समावेश होता. कारवाईदरम्यान एक व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर