
जळगाव, 4 डिसेंबर (हिं.स.)पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसरात कापूस खरेदीचा हंगाम रंगात असताना, उंबरीच्या शिवारातील हर्षल अनिल साठे या शेतकऱ्याच्या गोडाऊनवर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत तब्बल १५ क्विंटल कापूस लांबविल्याची घटना उघडकीस आली.
शेतकरी साठे यांचा शेतातील गोडाऊन फोडून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत मालाची चोरी केली असून, घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर