पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे दागिने चोरणारे बंटी अन् बबली अटकेत
सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। पाथर्डी ते कल्याण बसने प्रवास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे दागिने चोरी प्रकरणात बंटी अन् बबलीला पोलिसांनी अटक केली. देवराई येथील अलका मुकुंद पालवे यांच्या पर्समधील १० तोळे सोने व दीड लाखांची रोकड लांबवली होती. स
पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे दागिने चोरणारे बंटी अन् बबली अटकेत


सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। पाथर्डी ते कल्याण बसने प्रवास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे दागिने चोरी प्रकरणात बंटी अन् बबलीला पोलिसांनी अटक केली. देवराई येथील अलका मुकुंद पालवे यांच्या पर्समधील १० तोळे सोने व दीड लाखांची रोकड लांबवली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेतील आरोपी कोमल नागनाथ काळे (रा. पाथर्डी रोड, शेवगाव) व तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी हल्ली रा. शेवगाव) यांना अटक केली. दोघांकडून ९ लाख ३५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पालवे या पाथर्डी ते कल्याण बसने प्रवास करत असताना त्यांच्या पर्समधील दागिने व रोकड लंपास झाल्यानंतर पालवे यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कबाडी यांनी पथक तैनात करत या गुन्ह्याचा तपास सुरू केला असता हा गुन्हा काळे हिने केल्याचे स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande