जळगाव : पोलिसांनी मुद्देमालासह तिघांच्या आवळल्या मुसक्या
जळगाव , 4 डिसेंबर (हिं.स.)चाळीसगावच्या कन्नड घाटात चाकूचा धाक दाखवत तिघा तरुणांची लूट करण्यात आली. या लुट प्रकरणाचा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एका आठवड्यात तपास करून तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्या ताब्यातील रिक्षा, रोख रक्कम, मोबाई
जळगाव : पोलिसांनी मुद्देमालासह तिघांच्या आवळल्या मुसक्या


जळगाव , 4 डिसेंबर (हिं.स.)चाळीसगावच्या कन्नड घाटात चाकूचा धाक दाखवत तिघा तरुणांची लूट करण्यात आली. या लुट प्रकरणाचा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एका आठवड्यात तपास करून तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्या ताब्यातील रिक्षा, रोख रक्कम, मोबाईल तसेच गुन्ह्यातील वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता फिर्यादी मंगेश आल्हाट (रा. हतनूर, ता. कन्नड) हे मित्रांसह मोटारसायकलने चाळीसगाव येत होते. महामार्गाच्या कडेला थांबलेल्या या तिघांवर रिक्षातून आलेल्या तीन अनोळखी तरुणांनी हल्ला केला. त्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखवत आल्हाट यांच्या डाव्या हातावर वार केला आणि त्यांच्या खिशातील ६४०० रुपये हिसकावून घेतले. इतर दोघांनी साथीदार निवृत्ती भडंग यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल नेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी कोणताही सुगावा नसतानाही गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयित ऋषिकेश कासार याला त्याच्या रिक्षासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार गणेश महेंद्र पवार आणि रमेश उर्फ वाल्मिक सोमनाथ सुपलेकर (रा. जय बाबाजी चौक, चाळीसगाव) यांच्यासह गुन्हा केल्याचे कबूल केले. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून ४१०० रुपये रोख, चोरीचा मोबाइल फोन आणि हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande