
जळगाव, 4 डिसेंबर (हिं.स.) तालुक्यातील तालुक्याती सुजदे येथे घराच्या बाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्या ठिकाणी खेळत असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्रेम नरेंद्र सोनवणे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. प्रेम हा दुपारी घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये खेळत होता, पत्र्याच्या शेडवरील मुख्य विद्युत प्रवाह असलेली वायर तुटल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला, त्याचवेळी प्रेम त्या ठिकाणी खेळत असताना, त्याला शॉक लागला, काही शेजाऱ्यांना प्रेम त्या अवस्थेत दिसल्यानंतर लागलीच विद्युत प्रवाह खंडीत करीत त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषीत केले, प्रेम चे वडील नरेंद्र सोनवणे हे शेती करतात, तर आई दीपाली सोनवणे या गृहीणी आहेत. प्रेम याला लहान भाऊ देखील आहे. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांवर मोठा आघात झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर