चंद्रपूर : दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांचा सहभाग
चंद्रपूर, 5 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय जि.प. अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा- कर्मशाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून व
चंद्रपूर : दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांचा सहभाग


चंद्रपूर, 5 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय जि.प. अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा- कर्मशाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आला. यात विविध शाळांमधून 350 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 5 टक्के दिव्यांग निधी मधून वैयक्तिक लाभाच्या व सामुहिक लाभाच्या योजनांचा ग्रामीण भागातील सर्व पात्र दिव्यांग नागरिकांनी लाभ घ्यावा. याबाबत जिल्हा स्तरावरून जास्तीत दिव्यांगाना लाभ होण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे यांनी दिव्यांग हक्क अधिनियम 2016, दिव्यांग हक्क नियम 2017, महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क नियम -2024 तसेच दिव्यांगांसाठी असणारे इतर कायदे व दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणसाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व कायदे विषयी मार्गदर्शन केले.

या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील 16 शाळेतील अंध प्रवर्ग, मुकबधिर प्रवर्ग, मंतिमंद प्रवर्ग, अस्थिव्यंग प्रवर्ग असे एकुण 350 दिव्यांग विद्यार्थ्यानी 50 मी., 100 मी. आणि 200 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक,, अंध प्रवर्गासाठी बुध्दीबळ इ. क्रीडा स्पर्धेत भाग घेतला. क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे दिव्यांग विद्यार्थ्यांना बक्षीस तसेच सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग लाभार्थ्याना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तीन चाकी सायकल वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी. संचालन संजय पैचे यांनी तर आभार केशव दुर्गे यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande