जळगाव : घरात कुंटणखाना चालवणाऱ्या इसमावर कारवाई
जळगाव , 5 डिसेंबर (हिं.स.) पिंपळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत घरात कुंटणखाना चालवणाऱ्या इसमावर मोठी कारवाई केली आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने छापा मारत ही कारवाई केली
जळगाव : घरात कुंटणखाना चालवणाऱ्या इसमावर कारवाई


जळगाव , 5 डिसेंबर (हिं.स.) पिंपळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत घरात कुंटणखाना चालवणाऱ्या इसमावर मोठी कारवाई केली आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने छापा मारत ही कारवाई केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरखेडी येथे एका इसमाने स्वतःच्या राहत्या घरात आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवून परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला होता. ही गुप्त माहिती मिळताच (पिंपळगाव हरे.)पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी ही बाब पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात स्वतंत्र पथक गठीत करून कारवाईचे आदेश देण्यात आले. या आदेशानुसार पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस हेडकॉन्स्टेबल कॉन्स्टेबल अतुल पवार, अभिजित निकम, पोलीस नाईक राहुल बेहरे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे, अमोल पाटील, दीपक सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता चौधरी, वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील तसेच दोन पंच व पंटर यांच्या पथकाने वरखेडी येऊन दोन पंच व पंटरच्या माध्यमातून दि.४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. पंटरच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या या छाप्यात वरखेडी येथील आरोपी हैदर शहा रशिद शहा (४५) हा स्वताच्या फायद्यासाठी आपल्या राहत्या घरात महिलांना बोलावून त्यांना अल्प मोबदला देऊन त्यांच्यामार्फत देहव्यापार करुन घेत कुंडणखाना चालवत असल्याचे रंगेहाथ आढळून आल्याने या प्रकरणी हैदर शहा याच्या विरोधात पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार यांच्या फिर्यादीवरुन पिंपळगाव ( हरेश्वर )पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३५२/२०२५ अन्वये स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई करून रात्रीच सोडून देण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपळगाव (हरेश्वर)पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande