
नाशिक, 5 डिसेंबर (हिं.स.)।
- जिल्हा क्रीडा परिषद नाशिक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आणि फूटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथिल विभागीय क्रीडा संकुलच्या इनडोअर हॉलमध्ये राज्य शालेय फुटसाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आज झालेल्या १७ वर्षे वयोगटामध्ये मुलांमध्ये मुंबई विभागाच्या संघाने तर मुलींच्या गटात यजमान नाशिक विभागाच्या संघाने विजेतेपद पटकावले.मुलींच्या अंतीम सामन्यात नाशिकच्या संघाने कोल्हापूर संघावर ५-२ असा विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. मुलीमध्ये मुंबई विभागाच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला.१७ वर्षे मुलांच्या गटात मुंबई विरुद्ध नाशिक हाअंतीम सामना अत्यंत चुरशीचा झाला. प्रथम सत्रात ३-३ अशी बरोबरी होती. तर दुसऱ्या सत्रातही दहा मिनिटापर्यंत ५-५ अशी समसमान गोलची बरोबरी होती. शेवटच्या दोन मिनटात मुंबईच्या खेळाडूंनी संय्यमाने खेळ करत एक गोल केला. हा गोल त्यांना विजेतेपद मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरला. चांगला खेळ करणाऱ्या यजमान नाशिकच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलांमध्ये कोल्हापूरने तिसरा क्रमांक मिळविला.तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके यांच्या हस्ते, आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, राष्ट्रीय फुटसाल असोसिएशनचे संस्थापक- सचिव सुनील रघुनाथ पूर्णपात्रे ,फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रविण मोरे, क्रीडा अधिकारी श्रीमती चित्रा उदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनासाठी स्पर्धा प्रमुख निहार शाह, सहाय्यक स्पर्धा प्रमुख सत्यवान जाधव, किशोर चव्हाण , नाशिक फुटसालचे सचिव दिपक निकम , सहसचिव अविनाश वाघ आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
निकाल खालील प्रमाणे.१७ वर्षे मुले :प्रथम क्रमांक - मुंबई विभागद्वितीय क्रमांक - नासिक विभागतृतीय क्रमांक - कोल्हापूर विभाग१७ वर्षे - मुली :प्रथम क्रमांक - नाशिक विभागद्वितीय क्रमांक - कोल्हापूर विभागतृतीय क्रमांक - मुंबई विभाग.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV