पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 30 सप्टेंबरला - शंकर जाधव
नंदुरबार,, 26 सप्टेंबर (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10-00 वाजता गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 30 सप्टेंबरला - शंकर जाधव


नंदुरबार,, 26 सप्टेंबर (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10-00 वाजता गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय शनि मंदीर रोड, नंदुरबार येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शंकर जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या रोजगार मेळाव्यात जागेवर निवड संधी (प्लेंसमेंट ड्राईव्ह) उपलब्ध असून मेळाव्यात उमेदवारांसाठी विविध नामांकित उद्योजकांकडून 200 पेक्षा जास्त पदे उपलब्ध होणार आहेत, यासाठी 10 वी, 12 वी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा, आणि इंजिनिअरिंग उमेदवारांना संधी आहे. या मेळाव्यात हिताची के. बी. एक्स् कंपनी जळगांव, लिग्रेड कंपनी जळगांव, रुबी सर्जिकल जळगांव, छबी इलेक्ट्रिकल जळगांव, युवाशक्ती फाऊंडेशन नाशिक आणि एल.आय.सी. नंदुरबार इत्यादी नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत. या मेळाव्याचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande