नेपाळमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप
काठमांडू, 26 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळ “जेन-झेड आंदोलन”नंतर आता भूकंपाच्या धक्क्यांमुळे हादरलं आहे. शुक्रवारी(दि.२६) नेपाळच्या पूर्वेकडील रामेछाप जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केलवर नोंदवला गेला. या धक्क्यांमुळे लोक
नेपाळमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप


काठमांडू, 26 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळ “जेन-झेड आंदोलन”नंतर आता भूकंपाच्या धक्क्यांमुळे हादरलं आहे. शुक्रवारी(दि.२६) नेपाळच्या पूर्वेकडील रामेछाप जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केलवर नोंदवला गेला. या धक्क्यांमुळे लोक घाबरले आणि घरे सोडून बाहेर पळू लागले.

राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राच्या माहितीनुसार, शुक्रवारी रिश्टर स्केलवर ४.० तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली असल्याची तात्काळ माहिती मिळालेली नाही. हा भूकंप दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी झाला. त्याचे केंद्र राजधानी काठमांडूपासून सुमारे १५० किलोमीटर पूर्वेकडील रामेछाप जिल्ह्यातील वटैली परिसरात होते.

या आधी १७ ऑगस्ट रोजी सुद्धा याच जिल्ह्यात रिश्टर स्केलवर ४.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. नेपाळमध्ये या महिन्यात (सप्टेंबर) आलेला हा दुसरा भूकंप होता.तरीही हा एक कमी तीव्रतेचा भूकंप मानला जात आहे. ३ सप्टेंबर रोजी, नेपाळमध्ये दोनदा भूकंपाचे अशाच प्रकारचे धक्के जाणवले होते. यामध्येही कोणतीही हानी झाली नव्हती.

राष्ट्रीय भूकंप निरीक्षण केंद्रानुसार, पहिला भूकंप सकाळी ६:१५ वाजता गोरखा जिल्ह्यात झाला होता. त्याची तीव्रता सुद्धा ४.० इतकीच होती. त्याचे केंद्र काठमांडूपासून १५० किमी पश्चिमेकडील गोरखा जिल्ह्यातील हंसपूर येथे होते. त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता, आणखी एक भूकंप झाला. या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ४.१ इतकी मोजली गेली आणि त्याचे केंद्र दोलखा जिल्ह्यातील लापिलांग येथे होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande