‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबियांना मॅच फी दान करणार - पाक कर्णधार
अबुधाबी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताकडून 5 गडी राखून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सलमानने केवळ भारतीय संघाच्या ‘नो हँडशेक’ निर्णयाला क्रिकेटचा अपमान
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबियांना मॅच फी दान करणार - पाक कर्णधार सलमान


अबुधाबी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताकडून 5 गडी राखून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सलमानने केवळ भारतीय संघाच्या ‘नो हँडशेक’ निर्णयाला क्रिकेटचा अपमान म्हटले नाही, तर पत्रकार परिषदेच्या शेवटी धक्कादायक घोषणा करत असे सांगितले की, संपूर्ण पाकिस्तानी संघ आपली मॅच फी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबांना दान करणार आहे. म्हणजेच पाकिस्तानचे खेळाडू दहशतवाद्यांच्या कुटुंबांना मॅच फी देतील.

भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान केवळ पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला होता, ज्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार करण्यात आले होते. प्रेस कॉन्फरन्सच्या शेवटी पाकिस्तनाचा कर्णधार सलमान आगा म्हणाला “आमचा संपूर्ण संघ आशिया कपच्या अंतिम सामन्याची मॅच फी, भारताच्या मे महिन्यातील हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या नागरिक आणि मुलांच्या कुटुंबांना देत आहे.”

या घोषणेमुळे पाकिस्तानी कर्णधाराचा खरा चेहरा समोर आला आहे. या घोषणेमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दहशतवादी मसूद अझहर देखील आता आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. कारण, ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील अनेक सदस्य ठार झाले होते. यापूर्वीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमध्ये खेळाडूंमधील तणाव आणि वादविवाद पाहायला मिळाले आहेत. मात्र, आता थेट दहशतवाद्यांना मदत करण्याची भाषा वापरल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande