रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहराच्या जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 50 जणांनी रक्तदान केले. रत्नागिरी भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नियोजनातून व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी यासाठी नियोजन केले. या प्रसंगी राजू भाटलेकर, संदीप सुर्वे, नीलेश आखाडे, संतोष सावंत, अशोक वाडेकर, मनोज पाटणकर, राजन फाळके, रामदास शेलटकर, सत्यवती बोरकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, प्रज्ञा टाकळे, प्रीती शिंदे, सारिका शर्मा, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, संपदा तळेकर, प्रसाद बाष्टे, नितीन गांगण, अमित विलणकर, शैलेश बेर्डे, तुषार देसाई, नितीन जाधव, चंद्रकांत खेडेकर, विजय माळवदे, नरेंद्र कदम, पुंडलिक पावसकर, समीर सावंत, प्रशांत घाणेकर व संजीव बने आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी