छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
खाम नदीच्या काठावरील मकाई दरवाजाचे काम पूर्ण झाले असून आपण पाठपुरावा केल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनी आज सांगितले आहे. वेळोवेळी कामाच्या प्रगतीचा आढावाही घेतला होता.हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला झाला. काम वेळेत झाले याचे समाधान आहे. या भागातील लोकांच्या अडचणीला शिवसेना खंबीर उभी राहते आणि यापुढेही राहील, असे ते म्हणाले
खाम नदीच्या काठावरील मकाई दरवाजाचे काम पुरातत्व विभागाने हाती घेतले होते. यामुळे बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, जयसिंगपुरा, गुरुगणेशनगर, निपट निरंजन नगर, नर्सेस क्वार्टर, अमोदी हिल्स आदी भागातील लोकांची प्रचंड गैरसोय होत होती. हे काम या महिना अखेरीस पूर्ण करून लोकांची अडचण संपवा म्हणून मी सूचना केली होती.
वेळोवेळी कामाच्या प्रगतीचा आढावाही घेतला होता. हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला झाला. काम वेळेत झाले याचे समाधान आहे. या भागातील लोकांच्या अडचणीला शिवसेना खंबीर उभी राहते आणि यापुढेही राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis