छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजीनगर कार्यालय नवीन जागेवर स्थलांतरीत करण्यात आले आहे.
नवीन जागेचा पत्ता प्रमोदकुमार गणोरकर यांची इमारत प्लॉट नं ८३५, एन – ५ पाण्याच्या टाकीसमोर चिश्तीया चौक, सिडको, छत्रपती संभाजीनगर पिन नं. ४३१००३ येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहे, असे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती प्रिती बांद्रे – केळकर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis