सरन्यायमूर्ती गवई यांचे ओझर विमानतळ येथे स्वागत
नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांचे आज सायकांळी 5 वाजता ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उच्च न्यायालय, मुंबईचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, जिल्हा व
सरन्यायाधीश भूषण गवई यांचे ओझर विमानतळ येथे आगमन व स्वागत


नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांचे आज सायकांळी 5 वाजता ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उच्च न्यायालय, मुंबईचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक श्रीचंद जगमलानी, जिल्हा न्यायाधीश-1 ए. के. लाहोटी, जिल्हा न्यायाधीश-2 पी. एम. बदर यांनी तर प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्यावतीने ॲङ जयंत जायभावे, वकिल संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, वरिष्ठ कोर्ट मॅनेजर अशोक दारके यांनीही सरन्यायाधीश श्री. गवई यांचे स्वागत केले. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभहस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व वाहनतळ इमारतीचा भुमीपूजन समारंभ शनिवार, 27 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता पोलीस कवायत मैदानावर होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande