गाडी अडवण्याच्या प्रकारावर बावनकुळे आक्रमक; काँग्रेसला इशारा
अमरावती, 26 सप्टेंबर (हिं.स.) भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाडीला अडथळा आणण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या प्रकारावर अमरावतीचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रे
गाडी अडवण्याच्या प्रकारावर बावनकुळे आक्रमक; काँग्रेसला इशारा


अमरावती, 26 सप्टेंबर (हिं.स.)

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाडीला अडथळा आणण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या प्रकारावर अमरावतीचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी जर मला निवेदन द्यायचं असतं, तर त्यांनी मला बोलवावं, मी आलो असतो. गाडी अडवणं, काळे झेंडे दाखवणं, सोयाबीन फेकणं या गोष्टी योग्य नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.ज्या पद्धतीची कृती काँग्रेसने केली, ती जर पुन्हा झाली, तर आम्हालाही ‘जशास तसे’ उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले की, पोलिस आयुक्तांना यासंदर्भात सांगणार असून ज्यांनी गाडी अडवली त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असेही महसूल मंत्री बावनकुळे म्हणालेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande