सोलापूर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2024/25 मध्ये गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन 2 हजार 800 रुपये प्रमाणे ज्या शेतकऱ्यांची उर्वरित ऊस बीलाची रक्कम देणे राहिली होती ,ती सर्व रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडीक यांनी दिली.भीमा कारखान्याकडे गत हंगामात गाळपास आलेल्या उसाची साधारण तीन कोटी 52 लाख 17 हजार 175 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना देणे होती. ही सर्व रक्कम धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे चेअरमन महाडिक यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड