लातूर : बोरवटी गावात सौम्य भूकंपाची नोंद
लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। बोरवटी गावात भूगर्भातील आवाज भूकंप असून 2.2 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे आज सकाळी लातूर जिल्ह्यातील बोरवटी येथील भूगर्भात मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले.
लातूर : बोरवटी गावात  सौम्य भूकंपाची नोंद


लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

बोरवटी गावात भूगर्भातील आवाज भूकंप असून 2.2 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे

आज सकाळी लातूर जिल्ह्यातील बोरवटी येथील भूगर्भात मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने हे सौम्य भूकंपाचे धक्के असल्याचे कळविले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

लसकाळी 6.30 दरम्यान मौजे बोरवटी तालुका जिल्हा लातूर या गावात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती प्राप्त झाली होती.यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली येथे सदरील माहिती देऊन चौकशी करण्यात आली असता 2.2 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाली असल्याचे कळविण्यात आले आहे.सदरील भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande