पंजाबमधील अतिवृष्टी प्रभावित भागातील नागरिकांसाठी परभणीतून ब्रह्माकुमारींची मदत
परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। पंजाबमधील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी ब्रह्माकुमारी शिवराम नगर, परभणी आणि त्याच्या अंतर्गत उपसेवा केंद्रांनी एक महत्वाची मदत केली आहे. पंजाबमधील अतिवृष्टी प्रभावित भागातील महिला, पुरुष आणि
पंजाबमध्ये अतिवृष्टीमुळे प्रभावित पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी ब्रह्माकुमारींची मदत


परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

पंजाबमधील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी ब्रह्माकुमारी शिवराम नगर, परभणी आणि त्याच्या अंतर्गत उपसेवा केंद्रांनी एक महत्वाची मदत केली आहे. पंजाबमधील अतिवृष्टी प्रभावित भागातील महिला, पुरुष आणि लहान मुलाना परिधान करता येतील असे कपडे पाठवण्यात आले आहेत. या मदतीसाठी ब्रह्माकुमारी परिवारातील सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.

या सामाजिक उपक्रमाचे नेतृत्व शिवराम नगर येथील सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी अर्चना बहेनजीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दयाळू भावना आणि समाजाच्या कल्याणासाठी हे काम केले गेले. परभणी रेल्वे स्थानकावरून सचखंड एक्सप्रेसद्वारे ही मदत पंजाबमधील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. यावेळी

बी के अर्चना दीदी ( केंद्र संचालिका परभणी जिल्हा ), बी के वैष्णवी दीदी, बी के सीमा दीदी, बी के रूपाली दीदी, बी के रचना दीदी तसेच सत्य प्रेम पारसेवार भाई (सेवानिवृत्त इंजिनियर), के. पी. गायकवाड भाई (सेवानिवृत्त शासकीय अधिकारी), पांडुरंग बोरचाटे (वरिष्ठ राजयोगी), अर्जुन वसमतकर भाई (उद्योजक), अलका कुलकर्णी मॅडम (सेवानिवृत्त शिक्षिका), इतर माता व भाई उपस्थित होते.

ही मदत त्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी एक छोटेसे पण महत्वाचे पाऊल ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande