नाशिक : भाजपतर्फे स्वच्छता अभियान
नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.) : सिडको येथे सेवा पंधरवडा सप्ताहानिमित्त भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच राजरत्न नगर दुर्गामाता मंदिर येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात
नाशिक : भाजपतर्फे स्वच्छता अभियान


नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.) : सिडको येथे सेवा पंधरवडा सप्ताहानिमित्त भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच राजरत्न नगर दुर्गामाता मंदिर येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब घुगे व दशरथ गांगुर्डे यांनी केले. याप्रसंगी भाजप मंडल अध्यक्ष राहुल गणोरे, उपाध्यक्ष रवी पाटील, माजी नगरसेविका छाया देवांग, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रकाश चकोर, तुळशीराम भागवत, मंडल सरचिटणीस राजेंद्र जडे, प्रवीण सोनवणे, विलास सानप, दिलीप देवांग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत शिवाजी बरके यांनी केले तर, कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे व दशरथ गांगुर्डे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande