ढोरकीन ता. पैठण येथे ‘श्रीमद् भागवत, पंचरत्न हरिपाठ’चे मोफत वाटप
छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। ढोरकीन ता. पैठण येथे आज संत एकनाथ भजनी मंडळाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज जन्म शताब्दी वर्षानिमित्त सर्व भाविकांना ‘श्रीमद् भागवत तसेच पंचरत्न हरिपाठ’चे मोफत वाटप करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या
Q


छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

ढोरकीन ता. पैठण येथे आज संत एकनाथ भजनी मंडळाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज जन्म शताब्दी वर्षानिमित्त सर्व भाविकांना ‘श्रीमद् भागवत तसेच पंचरत्न हरिपाठ’चे मोफत वाटप करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार व्हावा, समाजात अध्यात्माची ओढ वाढावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. संत परंपरेने नेहमीच समाजाला एकतेचा, भक्तीचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला आहे. त्या परंपरेचे स्मरण करून घेताना आजचा हा प्रसंग सर्वांसाठी अध्यात्मिक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande