नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। दिव्यांग लाभार्थ्यांनी ‘५ टक्के सेस’ योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या जि.प. ५ टक्के सेस दिव्यांग व मागासवर्गीय कल्याण निधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सन 2025-26 या वर्षात दिव्यांग कल्याण व पुनर्वसन (जि.प. ५ टक्के सेस) तसेच मागासवर्गीय कल्याण निधी योजना राबविल्या जात आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून, यासाठी mhdivyang.com (नांदेड दिव्यांग मित्र व 20 टक्के मागासवर्गीय अनुदान योजना) ही संकेतस्थळ विकसित करण्यात आली आहे. पंचायत समित्यांअंतर्गत असलेल्या दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून, सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित कार्यालयास फॉरवर्ड करावेत. या योजनेअंतर्गत दिव्यांगांना त्यांच्या टक्केवारीनुसार प्राधान्याने (100 टक्के ते 40 टक्के अशा उतरत्या क्रमाने) लाभ देण्यात येणार आहे, अशी माहितीही समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis