पुणे : दिव्यांगांना कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत उपलब्ध
पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। भारत विकास परिषदेचे पुणे येथे कायमस्वरूपी दिव्यांग केंद्र कार्यरत असून येत्या वर्षात सुमारे बाराशे दिव्यांगांना महानगर नैसर्गिक वायू लिमिटेडच्या (एमएनजीएल) भरीव आर्थिक सहकार्यातून आधुनिक कृत्रिम पाय मोफत देण्याचा उपक्
पुणे : दिव्यांगांना कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत उपलब्ध


पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। भारत विकास परिषदेचे पुणे येथे कायमस्वरूपी दिव्यांग केंद्र कार्यरत असून येत्या वर्षात सुमारे बाराशे दिव्यांगांना महानगर नैसर्गिक वायू लिमिटेडच्या (एमएनजीएल) भरीव आर्थिक सहकार्यातून आधुनिक कृत्रिम पाय मोफत देण्याचा उपक्रम सुरू करीत असल्याची घोषणा परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख विनय खटावकर यांनी केली. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता चितळे व महानगर गॅसच्या ऋतुजा पायगुडे उपस्थित होत्या. प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांगाना कृत्रिम पाय देण्यात येऊन या उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.यावेळी खटावकर म्हणाले की,पुणे येथे गेल्या २५ वर्षांपासून हे केंद्र कार्यरत असून देशभरात परिषदेची कायमस्वरूपी १३ दिव्यांग केंद्र आहेत. केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय महा-दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले होते. एप्रिल २०२५ मधे ८९२ दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली आहे. कृत्रिम आधुनिक मॉड्युलर पायाची किंमत सुमारे 50 हजारापेक्षा जास्त आहे व यासाठी एमएनजीएलचे मोठे सहकार्य लाभले आहे.यावेळी चितळे म्हणाले की, भारत विकास परिषद ही एक राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी व त्यांच्यात राष्ट्रभाव, राष्ट्रीय एकात्मता जागृत करणारी सेवा व संस्कार क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम करणारी संस्था आहे. सद्यस्थितीत देशभरात दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना कृत्रिम पाय, हात, व कॅलिपर मोफत बसविण्यात येतात. दिव्यांगांनी यासाठी दूरध्वनी 020-29972349 किंवा 7378913197 या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande