फुलंब्रीतील जि.प. प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीचे भाजपा आ. अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। नवरात्री उत्सवानिमित्त फुलंब्री तालुक्यातील भालगाव येथे ''भक्तीचा जागर, श्रीशक्तीचा सन्मान आणि पैठणीचा खेळ'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील नव्या इमारती
अ


छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

नवरात्री उत्सवानिमित्त फुलंब्री तालुक्यातील भालगाव येथे 'भक्तीचा जागर, श्रीशक्तीचा सन्मान आणि पैठणीचा खेळ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील नव्या इमारतीचे उद्घाटन फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री.शिवाजीराव पाथ्रीकर, श्री.सांडू अण्णा जाधव, श्री.जितेंद्रबाबा जैस्वाल, श्री.आप्पासाहेब काकडे, मंडळ अध्यक्ष श्री.गोपाल पाटील वाघ, मंडळ अध्यक्ष श्री.सुचित बोरसे, माता भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande