शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष; माहिती पाठविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर/मुंबई , 26 सप्टेंबर (हिं.स.)। अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्यायावत कार्यवाही करण्यात येत असून या वर्षी देखील माहितीकोष अद्ययावत करण्यासाठी
शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष; माहिती पाठविण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर/मुंबई , 26 सप्टेंबर (हिं.स.)। अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्यायावत कार्यवाही करण्यात येत असून या वर्षी देखील माहितीकोष अद्ययावत करण्यासाठी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्यवी आस्थपनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इ.) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकाराच्या कर्मचाऱ्यांची माहिती दि.1 जुलै 2025 या संदर्भ दिनांकास अनुसरुन गोळा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून दि.17 सप्टेंबर 2025 रोजी सर्वकष माहितीकोष – 2025 बाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. जिल्हा स्तरावर संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालय शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून शासकीय कर्मचारी सर्वकष माहितीकोष – 2025 नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन संगणकीय आज्ञावली, फ्लोचार्ट, शासन परिपत्रक इ. शासनाच्या https://mahades.maharashtra.gov.in/CGE या संकेतस्थळावर EMDb – 2025 या नावाने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. माहिती नोंदणी करताना कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती नोंदणी करण्याची दक्षता आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावयाची आहे.

जिल्ह्याती सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी ऑनलाईन संगणकीय आज्ञावलीमध्ये माहिती नोंदणी दि.2 सप्टेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावयाची आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचे कडून दिले जाणारे माहिती नोंदणी केल्याचे प्रथम प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर, 2025 (November 2025 to be paid in December 2025) च्या वेतन देयकासोबत व माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2026 (Februray, 2026 to be paid in March 2026) च्या वेतन देयकासोबत जोडणे आवश्यक आहे.

सूचना संचातील मुद्दा क्र.6 नुसार EMDb – 2025 पेक्षा सेवार्थ प्रणालीमधील मंजूर पदांमध्ये तफावत आढळत असल्यात त्याबाबत त्यांच्या वरिष्ठ प्राधिकारी अधिकाऱ्यास मूळ विभागास (Parent Department) आणि लेखा व कोषागारे संचालनालयास (DAT) प्रस्ताव सादर करावा व त्याची एक प्रत जिल्हा सांख्यिकी कार्यालयास सादर करावी. अन्यथा सदर वेतन देयके कोषागार कार्यालय, अधिदान व लेख कार्यालयांकडून पारीत केले जाणार नाहीत.

शासन परिपत्रकाच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कार्यवाही करुन शासकीय कर्मचारी माहितीकोष तयार करण्यास सहकार्य करवे. असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालय उपसंचालक यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande