परभणी - गंगाखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना पालकमंत्र्यांची भेट
परभणी, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील धारासुर, सायाळा व सुनेगाव या गावांमध्ये अतिवृष्टी, महापूर व बॅक वॉटरमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानाची पाहणी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन केली. यावेळी पुरामुळे
गंगाखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना पालकमंत्र्यांची भेट


परभणी, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील धारासुर, सायाळा व सुनेगाव या गावांमध्ये अतिवृष्टी, महापूर व बॅक वॉटरमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानाची पाहणी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन केली.

यावेळी पुरामुळे बाधित झालेल्या शेतजमिनी, घरांचे नुकसान, तसेच जनावरांची झालेली हानी याची माहिती ग्रामस्थांकडून घेण्यात आली. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पिकांची स्थिती व सध्याच्या अडचणींबाबत पालकमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांनी विविध मागण्या व समस्या मांडत शासनाने तातडीने मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, महावितरणचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. तसेच स्थानिक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने हजर राहून परिस्थिती पालकमंत्री महोदयांना प्रत्यक्ष दाखवून दिली.

पालकमंत्री यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा दिला. तसेच शेतकरी व पूरग्रस्तांना शासनाकडून न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande